Posts

किल्ले प्रबळगड ट्रेक - 03 सप्टेंबेर 2017

Image
सह्याद्री आपल्याला अमर्याद आनंद देत असते. पण प्रत्यक्ष सकर्मे सह्याद्रीचे ऋण फेडणारी माणसे विरळच. त्या गणनेतच माझा एक सह्यमित्र म्हणजे ट्रेकर्स जर्नी संस्थेचा म्होरक्या प्रशांत भोईर. प्रशांतने जेव्हा किल्ले प्रबळगडचा ट्रेक लावला तेव्हाच माझ्या मनात ट्रेकवर जायची इच्छा प्रबळ झाली. पनवेलला एस. टी. स्थानकात सकाळी 7 वाजता भेटायचे ठरले होते. मला तर या दिवशी फार लवकर उठावे लागणार होते. सर्व पर्याय चाचपून पाहिले. वडाळावरून पनवेल लोकल पकडण्याशिवाय गत्यंतर नव्हते.   मी 5.40 ची लोकल पकडली. 4 वाजता उठल्यामुळे डोळ्यावरची झोप काही जात नव्हती. मला वाटले की गाडीत बसायला मिळेल मग थोडी झोप काढू. पण रविवार असला तरी गाडीला बरीच गर्दी होती. हा गणपती दर्शनासाठी शेवटचा सुट्टीचा दिवस होता. म्हणून लोकं सह-कुटुंब गणरायाच्या दर्शनासाठी सकाळीच निघाले होते - गर्दी टाळण्याच्या हिशोबाने. त्यात त्यांना कितपत यश मिळाले हे त्यांचे त्यांनाच ठाऊक :) पनवेल स्टेशनला लोकल आल्यावर मला प्रशांतचे फोन आले. मला वाटले की मला उशीर झाला आहे की काय. मी धावत-पळत एस. टी. स्थानकात आलो. काही जण आधीच जमले होते. एक मोठा नवख्या ट्रेक

उंबरखिंड ते नागफणी ट्रेक - 17 जून 2017

Image
मॉन्सूनने या वर्षी हजेरी जरा उशिराच लावली आहे. पण माझ्या या पावसाळी ट्रेकिंग पर्वाची सुरूवात महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाणेघाटच्या नाईट ट्रेकने झाली. पण नाणेघाटला पाऊस तसा रिप-रिपच होता. म्हणून पहिल्या पावसात भिजायची मजा मात्र काही त्या ट्रेकवर घेता आली नाही. पुढच्या आठवड्यातही पावसाने ही आशा दाखवली नाही.  मी नियमीत ट्रेकिंग करतो हे ऑफीस मध्ये सर्वज्ञात आहे. नीरज या माझ्या सहकार्‍याने सुचवले की तू ऑफीसच्या लोकांसाठी एक ट्रेक लावला पाहिजेस [ ट्रेकर मंडळींच्या भाषेत 'ट्रेक लावणे' म्हणजे ट्रेकचे नियोजन करणे :) ]. आता ऑफीसची जनता काही आपली रोजची भटके कंपनी नव्हे. कधी कुठेतरी ट्रेकच्या नावावर एखादा छोटा-मोठा डोंगर एके काळी चढले असतील. सह्याद्रीमध्ये ट्रेकिंगबद्दल गैरसमज असणारे, कुतूहल असणारे तर काही सह्याद्रीला हलक्यात मोजणारे. या टोळीला कोणत्या ट्रेकवर घेऊन जावे, असा मला प्रश्न पडला. ट्रेक सरळ सोपा असावा, जास्त चढ-उतार नको, लंचला गावरान चिकन असावे, धबधब्यात डुंबायला मिळावे असे आर्जवे माझ्याकडे आले. मी आधी उल्हास नदी खोरे अथवा माथेरान सनसेट पॉइंटच्या ट्रेक्सचा विचार करत होत