Posts

Showing posts from June, 2017

उंबरखिंड ते नागफणी ट्रेक - 17 जून 2017

Image
मॉन्सूनने या वर्षी हजेरी जरा उशिराच लावली आहे. पण माझ्या या पावसाळी ट्रेकिंग पर्वाची सुरूवात महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाणेघाटच्या नाईट ट्रेकने झाली. पण नाणेघाटला पाऊस तसा रिप-रिपच होता. म्हणून पहिल्या पावसात भिजायची मजा मात्र काही त्या ट्रेकवर घेता आली नाही. पुढच्या आठवड्यातही पावसाने ही आशा दाखवली नाही.  मी नियमीत ट्रेकिंग करतो हे ऑफीस मध्ये सर्वज्ञात आहे. नीरज या माझ्या सहकार्‍याने सुचवले की तू ऑफीसच्या लोकांसाठी एक ट्रेक लावला पाहिजेस [ ट्रेकर मंडळींच्या भाषेत 'ट्रेक लावणे' म्हणजे ट्रेकचे नियोजन करणे :) ]. आता ऑफीसची जनता काही आपली रोजची भटके कंपनी नव्हे. कधी कुठेतरी ट्रेकच्या नावावर एखादा छोटा-मोठा डोंगर एके काळी चढले असतील. सह्याद्रीमध्ये ट्रेकिंगबद्दल गैरसमज असणारे, कुतूहल असणारे तर काही सह्याद्रीला हलक्यात मोजणारे. या टोळीला कोणत्या ट्रेकवर घेऊन जावे, असा मला प्रश्न पडला. ट्रेक सरळ सोपा असावा, जास्त चढ-उतार नको, लंचला गावरान चिकन असावे, धबधब्यात डुंबायला मिळावे असे आर्जवे माझ्याकडे आले. मी आधी उल्हास नदी खोरे अथवा माथेरान सनसेट पॉइंटच्या ट्रेक्सचा विचार करत होत